देश

मोदींच्या शपथविधी सोहळ्याला वारकऱ्यांचीही उपस्थिती!

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली.  राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदींसोबत ५८ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला वारकरी संप्रदायातल्या 11 मान्यवरांना खास निमंत्रण देण्यात आले होते. ऐन एकादशीच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी असल्याने या निमंत्रणाला खास महत्त्व आहे. त्यामुळे पंढपूरातून वारकऱ्यांचे प्रतिनिधीत्व सोहळ्यात असल्याने […]

क्रीडा

बीसीसीआयकडून या खेळाडूचे तीन महिन्यांसाठी निलंबन

आज इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. मात्र याच दिवशी एका खेळाडूचे बीसीसीआयने तीन महिन्यांसाठी निलंबन केले आहे. रिंकू सिंह असे या खेळाडूचे नाव असून तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो. त्याचबरोबर भारताच्या ‘अ’ संघाकडूनही हा युवा खेळाडू खेळला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील ‘अ’ संघांमध्ये आजपासून सामना खेळवण्यात येणार होता. पण या निलंबनामुळे रिंकूला […]

मनोरंजन

हे सेलिब्रेटी राहणार मोदींच्या शपथविधीला उपस्थित !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी सोहळा होणार आहे. शपथविधीची तयारी राष्ट्रपती भवनात जोरात सुरू आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल सहा हजार पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारांचाही समावेश असणार आहे. यामध्ये सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन हे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यासोबतच बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रणौत, शाहरुख […]

देश

शपथविधीआधी मोदींकडून शहिदांना आदरांजली आणि महात्मा गांधी स्मृतीस्थळाला अभिवादन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळात कोणते जुने चेहरे कायम राहतील आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांचा समावेश होईल, याबाबतची उत्सुकता संपूर्ण देशाला लागलेली आहे. शपथविधी आधी मोदींनी गुरुवारी (30 मे) शहिदांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी आणि अटलजींच्या स्मृतीस्थळालाही अभिवादन केले आहे. नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी तब्बल सहा हजार पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. शपथविधीसाठी बांगलादेश, […]

विदेश

जपानमध्ये तरुण माथेफिरुचा जमावावर हल्ला, दोघांचा मृत्यू

जपानमध्ये एका तरुण माथेफिरुने जमावावर चाकूने हल्ला केला आहे. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 17 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जपानमधील कावासाकी शहरातील एका पार्कच्या बाहेर हा हल्ला करण्यात आला आहे. एका माथेफिरू तरूणाने जवळपास 20 लोकांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात 19 जण […]

मनोरंजन

या अभिनेत्रीने दोन कोटींची जाहिरात नाकारण्यामागचे सांगितले हे कारण…

तेलुगू अभिनेत्री साई पल्लवीने काही दिवसांपूर्वी फेअरनेस क्रीमची 2 कोटी रुपयांची जाहीरात नाकारल्यामुळे ती खूप चर्चेत होती. त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक झाले आहे. ही जाहिरात नाकारण्यामागचा तिचा नेमका हेतू काय होता याचा खुलासा तिने एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. पल्लवी म्हणाली, ‘मी ही जाहिरात करू शकत नाही कारण मी एक भारतीय आहे आणि […]

टेक्नॉलॉजी

मृत्यूनंतर आपोआप डिलिट होणार तुमचे जीमेल अकाऊंट !

मृत्यूनंतर आपोआप तुमचे जीमेल अकाऊंट डिलिट होणार असल्याची सुविधा गुगलने उपलब्ध करुन दिली आहे. पाहूयात हे कसं शक्य आहे तर.. सर्वात आधी मायअकाऊंट डॉट गुगल डॉट कॉम वर जा(myaccount.google.com)  या लिंक वर जा. त्यानंतर Data & personalization या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून Make a plan for your account या ऑप्शनवर क्लिक करा. […]

मनोरंजन

कपिल म्हणतो, काय अमेरिकेतही मोदी निवडूण आले?

कॉमेडी किंग कपिल शर्माची कॉमेडी जगभरात प्रसिध्द आहे. त्याची कॉमेडीने प्रेक्षकांचे अक्षरशः हसून हसून पोट दुखते. मात्र कपिलवर सध्या मोदी फिवर चढला आहे. कपिलने नुकताच त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत तो मोदींचे कौतुक करताना दिसतो. यामध्ये कपिलने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. त्याच्यासोबत चंदन प्रभाकर आणि सुमोना चक्रवर्तीही आहेत. कपिल […]

क्रीडा

भारताचा हा खेळाडू करतोय आलिया भट्टच्या बेस्ट फ्रेन्डला डेट

आयसीसी वर्ल्ड कपला काही तासांचा अवधी शिल्लक  राहिलेला आहे. त्यातच आता भारतीय खेळांडूच्या बाबतीत काही नवीन गोष्टी कानावर ऐकू येत आहे. दरम्यान बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यात चर्चेचा विषय ठरला तो, केएल राहुल. राहुलनं विराटची चिंता मिटवत, चौथ्या क्रमांकावर धडाकेबाज फलंदाजी करत शतकी खेळी केली. दरम्यान या शतकी खेळीच्या जोरावर त्याने आपलं संघातील स्थानही पक्कं केले. […]

देश

शरीराचे 36 तुकडे केले तरी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही

लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसचा मोठा पराभव झाल्यामुळे कॉंग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेस पक्ष एकजूट असून कोणीही भाजपमध्ये जाण्याचा विचारही करत नाहीत, असे सांगत काँग्रेस नेते आणि आमदारांनी भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा असल्याचे सांगत वृत्त फेटाळून लावले आहे. ‘माझ्या शरीराचे 36 तुकडे जरी केले तरीही मी भाजप प्रवेश करणार नाही’, असे […]