मनोरंजन

किराणा, भाजी घरी घेऊन आल्यावर काय काय करायचे; पाहा हीना सांगते !

सध्या देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी सेलिब्रेटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याची माहिती देत आहे. अशातच आता सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणारी अभिनेत्री हिना खानने प्रेक्षकांना बाजारातून भाजी किंवा किराणा आणल्यावर त्याची कशी स्वच्छता कशी करायची […]

विदेश

कोरोनामुळे तब्बल 75 वर्षानंतर पृथ्वीवर इतकी शुध्द हवा

सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे पृथ्वीवर तब्बल 75 वर्षानंतर इतकी शुध्द हवा आहे. दुसऱ्या महायुध्दानंतर पृथ्वीवर अशी स्वच्छ हवा आहे. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, दुसऱ्या महायुद्धानंतर ही पहिली वेळ असेल जेव्हा कार्बन उत्सर्जन पृथ्वीवर सर्वात कमी होत आहे. […]

विदेश

अमेरिकेत कोरोनामुळे एक कोटी लोक झाले बेरोजगार

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अमेरिकेत मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार थांबल्यामुळे गेल्या दोन आठवड्यात तब्बल 1 कोटी लोक बेरोजगार झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या इतिहासात बेरोजगारीचा हा उच्चांक असल्याचं बोललं जात आहे. व्यवहार बंद असल्याने आणि मागणी घटल्याने अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. […]

देश

‘तर संपूर्ण देश आणि राज्य एक आठवड्यांसाठी अंधारात जाईल’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना जनतेला आवाहन केले की 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील लाईट बंद करुन दिवे लावा असं त्यांनी सांगितलं आहे.  मात्र अनेकांनी जर एकाचवेळी लाईट बंद केली तर तांत्रिक अडचण निर्माण होईल अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी 5 एप्रिलला […]

महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये व्हिडिओ कॉलवरच पार पडला लग्नसोहळा

सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांनी आपल्या घरातील लग्नकार्य पुढे ढकलेले आहे. मात्र औरंगाबादमध्ये लॉकडाऊन असताना देखील विवाह सोहळा पार पडला आहे. मात्र यांनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता हा लग्न सोहळा पार पाडला आहे. हा विवाह सोहळा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून करण्यात आला आहे. औरंगाबादचा मोहम्मद मिन्हाजुद या तरुणाने काल (3 एप्रिल) बीडच्या तरुणीसोबत व्हिडीओ […]

देश

‘मोदीजी तुम्ही खेळाडूंऐवजी शेतकरी, मजूर, डॉक्टरांशी चर्चा करायला पाहिजे होती’

मोदीजी तुम्ही खेळाडूऐवजी शेतकऱ्यांशी, मजूरांशी आणि डॉक्टरांशी चर्चा केली असती तर जास्त आनंद झाला असता अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. “मोदीजी सेलिब्रिटी खेळाडू बरोबर करोना बाबत चर्चा केलीत अभिनंदन!! पण गरीब मजूर, शिवारात सडून चाललेल्या पिकाकडे असहाय्य्यपणे पाहणाऱ्या शेतकऱ्याशी, सेफ्टी किट […]

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 537 वर

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आता कोरोनाग्रस्तांची संख्या 537 वर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 47 ने वाढली आहे. २८ पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत तर १५ पॉझिटिव्ह रुग्ण ठाण्यात सापडले आहेत. अमरावतीत १ रुग्ण, २ पुण्यात, तर पिंपरीत १ रुग्ण सापडला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ५३७ वर गेली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत ही संख्या ४९० […]

महाराष्ट्र

राज्यातील लॉकडाऊन काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतोः राजेश टोपे

महाराष्ट्रातील लॉकडाऊन काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपत आहे. मात्र महाराष्ट्रामधील करोनाग्रस्तांची संख्या पाहता राज्यातील लॉकडाउनचा कालावधी वाढण्याचा इशारा आरोग्य मंत्र्यांनी दिला आहे. “देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करण्याच्या दोन दिवस आधीच आम्ही राज्यामध्ये लॉकडाउनची घोषणा केली होती. […]

महाराष्ट्र

‘दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधान मोदींनी आशेचा किरण दाखवायला पाहिजे’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना केलेल्या भाषणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे. ‘लोक घरातच आहेत तर दिवे पेटवतील. मात्र पंतप्रधानांच्या भाषणातून आशेचा किरण दिसायला पाहिजे होता. देशातील रुग्णांची स्थिती काय आहे, बाकी त्यांच्यावरील उपचारांची स्थिती काय आहे, गरिबांच्या अवस्था बिकट झाली आहे, याबाबत त्यांनी भाष्य करणं अपेक्षित होतं,’ असं म्हणत […]

महाराष्ट्र

‘एवढी शांतता मुंबईच्या दंगलीतही पाहिली नव्हती’

एवढी शांतता आपण ९२-९३ च्या दंगलीतही पाहिली नव्हती असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. “असा प्रसंग आजपर्यंत कोणाच्या आयुष्यात आला नव्हता. असं कधी बघितलं नव्हतं. एखाद्या देशात एखादी घटना घडते हे आपण पाहिलं आहे. पण जगभर एकच गोष्ट घडतीये असं कोणी पाहिलेलं नाही. मी इतकी शांतता मुंबईच्या दंगलीतही पाहिली नव्हती,” असं राज ठाकरेंनी […]