पुणे महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील ‘या’ दोन तालुक्यात पुन्हा कडक लॉकडाऊन

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पुणे जिल्हयातील भोर आणि वेल्हा या दोन तालुक्यात आजपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून 31 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. मागील काही दिवसांपासून या तालुक्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने खबरदारी म्हणून भोर प्रशासनाने 31 जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. […]

देश

कोरोनाने मोडला आतापर्यंतचा रेकॉर्ड; 24 तासांत 45,720 नवे रुग्ण

कोरोनाने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या 24 तासांत 45 हजार 720 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 24 तासांत 1 हजार 129 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 लाख 38 हजार 635 इतकी झाली आहे. आतापर्यंत सात […]

महाराष्ट्र

राज्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात कोरोनाचे 10,576 नवे रुग्ण

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आज दिवसभरात 10 हजार 576 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आता  3 लाख 37 हजार 607 वर पोहोचली आहे. तर आज 280 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यत 12,556 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आज 5552 रुग्ण बरे होऊन घरी गेले […]

देश

कर्नाटक राज्य झालं लॉकडाऊन फ्री

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी उद्यापासून राज्यात लॉकडाऊन लागू नसल्याची घोषणा केली आहे. आता कर्नाटक हे लॉकडाऊन फ्री राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. “उद्यापासून राज्यात लॉकडाउन होणार नाही. लोकांनी आता कमावर परतायला हवं. अर्थव्यवस्थेला हातभार लागणं हे गरजेचं आहे. […]

देश

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षीची अमरनाथ यात्रा रद्द

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून यावर्षीची अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. श्रीअमरनाथ श्राइन बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. यावर्षीची अमरनाथ यात्रा 21 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान ही यात्रा सुरू राहणार होती. याआधी जूनमध्ये श्राइन बोर्डाने बालटाल भागातून यात्रेचा मार्ग निश्चित केला होता. पण रस्ता पूर्णपणे तयार नसल्याने त्याला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर […]

देश विदेश

अमेरिकेत कोरोनामुळे 1 लाख 40 हजार रुग्णांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंद अमेरिकेत होत आहे. शनिवारी अमेरिकेत कोरोनामुळे मृतांची संख्या 1,40,000 वर पोहोचली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जून महिन्यापासून दावा करीत आहेत की, कोरोनाचा प्रसार हळूहळू थांबला आहे. परंतु असे दिसून येत आहे की बर्‍याच ठिकाणी नवीन रुग्ण वाढत आहेत […]

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची घोषणा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत जिल्ह्यात 22 ते 30 जुलै दरम्यान लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. ग्रामपंचायत वगळता पूर्ण सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे 30 जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार  […]

महाराष्ट्र

अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहेः संजय राऊत

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. ते जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही गेले होते आणि झाल्यावरही गेले. उद्धव ठाकरे अयोध्येला नेहमी जातात. अयोध्येचा रस्ताच शिवसेनेने तयार केला आहे असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. अयोध्येच्या रस्त्यावरील अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत, ते राजकारण म्हणून नाही. अयोध्या आणि शिवसेनेचं नातं कायम […]

महाराष्ट्र

‘उध्दव ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही’

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. अयोध्या आणि शिवसेनेचं जुनं नातं असून ते राजकीय नाही. राजकारणासाठी आम्ही अयोध्येला जात नाही आणि गेलो नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे असंही ते म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र […]

महाराष्ट्र मुंबई

मुंबईच्या पालकमंत्र्यांना कोरोनाची लागण

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्वीट करुन माहिती दिली आहे.   This is to inform that I’ve tested positive for #COVID19. I’m currently asymtomatic and isolating myself. I request all those who have come in close contact with me to get themselves tested. I will continue to work […]