viju khote
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन

मराठीसह हिंदी सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलेले ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे. विजू खोटे ७८ वर्षांचे होते. खोटे यांनी हिंदी आणि मराठी अशा एकूण तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. १९६४ साली त्यांनी ‘या मालक’ सिनेमामधून सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ‘अनोखी रात’, ‘जिने की राह’, ‘पगला कही का’, ‘रामपूर का लक्ष्मण’, […]

narayan rane
महाराष्ट्र

अखेर नारायण राणेंचा भाजप प्रवेशाचा मुहुर्त ठरला

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते व राज्यसभेचे खासदार नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती मात्र आता नारायण राणेंचा भाजप प्रवेशाचा मुहुर्त ठरला आहे. 2 ऑक्टोबरला राणे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र राजकीय समीकरणांमुळे हा प्रवेश अनेकदा पुढे ढकलला गेला. आता अखेर […]

man ki baat program
देश

मुलींच्या सन्मानार्थ ‘भारत की लक्ष्मी’ अभियान: नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात देशातील मुलींच्या सन्मानार्थ ‘भारत की लक्ष्मी अभियान’ राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी म्हणाले, “आजपासून उत्सवांचा काळ सुरू होत आहे. देशभरात उत्सवाची रोषणाई राहिल. दिवाळीमध्ये सौभाग्याचं आणि समृद्धीच्या रूपाने लक्ष्मीचं आगमन होतं. आपल्या संस्कृतीत मुलींना लक्ष्मी म्हटलं जातं. मुलगी समृद्धी आणते. या दिवाळीत वेगवेगळ्या क्षेत्रात […]

देश

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर आणली बंदी

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आज कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. कांद्याच्या निर्यातीचा निर्णय तात्काळ लागू केला गेल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

pakistan has stopped sending postal mails
विदेश

काश्मीर प्रश्नावरुन पाकिस्तानने भारतासाठी बंद केली ‘ही’ सेवा

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान आक्रमक भूमिकेत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी करण्याचा कट करणाऱ्या पाकिस्तानने आता चक्क टपाल सेवाच बंद केली आहे. पाकच्या या निर्णयामुळे आता पाकिस्तानमधून भारतात कोणतेही टपाल येणार नाही. यासंदर्भातील माहिती शनिवारी देण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी करण्याचा कट करणाऱ्या पाकिस्तानने आता चक्क टपाल सेवाच […]

reserve bank of india
देश

आता आरबीआयची ‘या’ बॅंकेवर कारवाई

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेवरील रिझव्‍‌र्ह बँकेच्या आर्थिक र्निबधानंतर आता लक्ष्मी विलास बँकेवर कडक कारवाई करण्यात आली आहे. या बँकेला पीसीए (PCA) यादीत टाकण्यात आले आहे. पीसीए (PCA) म्हणजेच प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन. या श्रेणीतल्या बँकांची आर्थिक स्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत बँक नवे कर्ज देऊ शकत नाही. याआधीही आणखी काही सहकारी बँका पीसीए (PCA) मध्ये […]

ajit pawar
महाराष्ट्र

अन् अजित पवारांना अश्रू झाले अनावर…

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी आपण राजीनामा का दिला याचे कारण सांगितले. शिखर बँक प्रकरणात शरद पवार संचालक पदावर नव्हते, सभासद नव्हते त्यांचा दुरान्वये संबंध नाही तरीही त्यांचं नाव या सगळ्या प्रकरणात आणलं गेलं. हा सगळा निव्वळ बदनामीचा डाव आहे. […]

पुणे महाराष्ट्र

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर ‘या’ नगरसेवकाने दिला राजीनामा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढविले गेले. त्याच दरम्यान पिंपरी-चिंचवडच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या एका नगरसेवकाने देखील राजीनामा दिला आहे. नगरसेवक जावेद शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे त्यांनी या संदर्भातील पत्र दिले आहे. अजित पवार यांचे बारामतीबरोबरच पिंपरी-चिंचवड […]

पुणे महाराष्ट्र

राजकारण सोडून देऊ, आता शेती करु; अजित पवारांनी दिला पार्थला सल्ला

आपण राजकारण सोडून देऊ शेती किंवा व्यवसाय करु असाही सल्ला अजित पवार यांनी त्यांच्या मुलांना दिला. अशी माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजित पवारांनी या निर्णयाची कल्पना कुणालाच दिली नव्हती असं आता खुद्द शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार […]

पुणे महाराष्ट्र

म्हणून अजित पवारांनी दिला राजीनामा, शरद पवारांनी सांगितले कारण..

मला अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. असा खुलासा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. शरद पवार म्हणाले की, मी त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क साधला. अजित पवार यांच्या मुलांशी चर्चा झाली. त्यावेळी काकांवर गुन्हा दाखल झाल्याने मी अस्वस्थ आहे असं अजित पवार यांनी मुलांना सांगतिलं. त्याचमुळे त्यांनी राजीनामा […]