मनोरंजन

मराठी बीग बॉसच्या घरात होणार सलमानची एन्ट्री

बीग बॉस मराठीच्या सिझन २  ला चांगली दमदार सुरुवात झाली आहे. आता सलमान खान बीग बॉसच्या घरात एन्ट्री करणार असल्याचे बोलले जात आहे. भारत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 150 कोटींची कमाई केली आहे. सलमान-कतरिनाच्या जोडीने बॉक्स ऑफिसवरच नाही तर अनेकांच्या मनातही घर केले आहे. आता या दोघांची जोडी बीग बॉसच्या घरात जाणार असल्याची भलतीच चर्चा रंगली […]

देश

गुजरातला मिळाला दिलासा; वायू चक्रीवादळाचा थेट धोका टळला

‘वायू’ चक्रीवादळाने दिशा बदलून आता गुजरातच्या दक्षिण समुद्र किनाऱ्याला समांतर अंतराने प्रवास सुरू ठेवला आहे. त्यामुळे ‘वायू’ चक्रीवादळाचा तडाखा थेट गुजरातला बसणार नसला तरीही समुद्र किनाऱ्यावर मात्र परिणाम दिसून येणार आहे. समुद्र किनाऱ्याला उधाण आलं असून परिसरात साधारण ताशी 155 ते 165 किमी वेगानं वारे वाहात आहेत. वायू चक्रीवादळाचा धोका मुंबईसह कोकण किनारपट्टीला नसला तरी […]

महाराष्ट्र

महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहेः संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आदीत्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आणि या दोघांच्या गळाभेटीचा एका फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. आणि त्या फोटोखाली लिहीले आहे की, ‘महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहे.’  संजय राऊत यांनी जणू आदित्य ठाकरे येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेतच दिले आहे.               […]

क्रीडा

ICC World Cup 2019: टीम इंडियानेही पाहिला ‘भारत’

आयसीसी वर्ल्ड कप सुरु असताना देखील टीम इंडियाने सलमान खानचा भारत हा सिनेमा पाहिला आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहिल्यावर सलमान खानने भारतीय संघाचे आभार मानले आहेत. भारतीय संघाने विश्वचषकात दोन सामने जिंकले आहेत. आता न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा संघ सराव करत आहे. पण या दरम्यानच्या काळात भारतीय संघाने भारत हा सिनेमा पाहिला. भारतीय संघातील केदार जाधवने […]

क्रीडा

ब्रायन लारा पोहोचला थेट ताडोबाच्या जंगलात; फोटो व्हायरल

वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज ब्रायन लारा हा क्रिकेट विश्वचषकाच्या एका कामासाठी मुंबईत आला आहे. यावेळी भारताच्या एका माजी खेळाडूने लाराला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याचे सुचवले. त्यानुसार लारा ताडोबा येथे पोहोचला. आता भारताच्या कोणत्या खेळाडूने लाराला हा सल्ला दिला, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. चला तर आम्ही तुम्हाला सांगतो..   भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल […]

लाईफस्टाईल

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी या भाज्यांचे सेवन करा…

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पालेभाज्यांचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे. पालेभाज्यांच्या सेवनामुळे शरीरात चरबी वाढत नाही आणि पोटही भरल्यासारखं वाटतं. पोटाच्या आजूबाजूला जमा होणारी चरबी कमी करण्याचे काम पालेभाज्या करतात. पालेभाज्यांच्या सेवनाने पोटाचा घेर कमी होतो. कॅलरीज कमी होतात आणि भूकही कमी लागते. पालक रक्तवाढीसाठी आणि हाडे बळकट करण्यसाठी गुणकारी आहे. अंबाडी या पालेभाजीत ‘क’ जीवनसत्व भरपूर […]

लाईफस्टाईल

पावसाळ्यात फिरायला जाताना या गोष्टींची घ्या काळजी !

आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता प्रत्येकजण फिरायला कुठे जायचे यासाठी प्लॅनिंग करत आहेत. मात्र पावसाळ्यात फिरायला जाताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर तुमचा बेफिकीरपणा तुमच्या जीवावर बेतू शकतो. अलिकडे सर्वांनाच सेल्फीचे वेड लागले आहे. सेल्फीमुळे जीव जाणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढली आहे. कुठलाही विचार न करता एकापेक्षा एक सेल्फी घेण्याच्या नादात तरुण मंडळी […]

विदेश

किती दिवस पाकिस्तान उधारीवर जगणार, देश चालवायला पैसे नाहीतः इम्रान खान

किती दिवस पाकिस्तान उधारीवर जगणार देश चालवायला पैसे नाहीत अशी खंत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज देशाला संबोधीत करताना व्यक्त केली.  पाकिस्तान दिवळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. कर्जाचा प्रचंड बोजा, जवळजवळ ठप्प झालेला विकास, वाढत नसलेला महसूल आणि भ्रष्टाचार यामुळे देश रसातळाला गेल्याचे इम्रान खान यांनी सांगितले. परिस्थिती पुन्हा सुरळीत करायची असेल तर देशातल्या प्रत्येकाला […]

क्रीडा

क्रिकेटप्रेमींना परदेशातही मिळतोय आता चटकदार भेळचा आस्वाद

सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपचा महासंग्राम रंगला आहे. वर्ल्ड कपचे सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. याचबरोबर इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय वंशाचे नागरिक राहतात. त्यामुळे या लोकांना भाजलेल्या शेंगा आणि चटकदार भेळची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मात्र आता इंग्लंडच्या रस्त्यावर भेळ आणि भाजलेल्या शेंगा या दोन्ही गोष्टी खायला मिळत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमी […]

मनोरंजन

देवदत्त नागे दिसणार आता हिंदी चित्रपटात ?

जय मल्हार या मालिकेतील खंडेराया या भूमिकेमुळे घराघरात देवदत्त नागे हे नाव पोहचले. या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तरी प्रेक्षकांच्या मनात देवदत्त नागेची व्यक्तिरेखा कायम आहे. त्यामुळे त्याच्या फॅन्सची संख्या देखील वाढली आहे. आता ह्याच फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. देवदत्त लवकरच एका हिंदी चित्रपटात झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याने नुकताच त्याच्या […]