विदेश

श्रीलंकेत 9 मुस्लिम मंत्र्यांनी दिला राजीनामा

श्रीलंकेत एप्रिल महिन्यात इस्टर संडेच्या दिवशी चर्चे व अनेक हॉटेल्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुस्लिम समुदाय राक्षस असल्याचे चित्र निर्माण केले जात असल्यामुळे या वक्तव्याच्या निषेधार्थ सामूहिक भूमिका म्हणून श्रीलंका सरकारमधील नऊ मुस्लिम मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये चार मंत्री कॅबिनेट दर्जाचे आहे. तत्पूर्वी, पूर्व आणि पश्चिम प्रांतांचे मुस्लिम राज्यपाल अनुक्रमे एम.एल.ए.एम. हिजबुल्लाह आणि अझाथ सॅल्ली […]

लाईफस्टाईल

हे फळ दररोज खाल्याने तुम्हाला कधीच डॉक्टरकडे जावं लागणार नाही

तुम्हाला तुमचे आरोग्य जर निरोगी ठेवायचे असेल तर दररोज  सकाळी एक सफरचंद खायला हवे. यामुळे अनेक आजार तुमच्यापासून लांब राहतात. त्यामुळे तुम्हाला कधीच डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही. सफरचंदात मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. सफरचंद खाण्यामुळे अल्झायमर, कर्करोग आणि ट्यूमरसारखे रोग होत नाही, असा दावा बऱ्याच संशोधनांमध्ये करण्यात आला आहे. ह्रदयरोगासाठी सफरचंद […]

मनोरंजन

तैमुरला या गोष्टीची सवय लागू नये, म्हणून करीना आणि सैफ घेतात ही काळजी !

स्टार किड्स मध्ये सगळ्यात जास्त प्रसिध्द मिळविलेला किड्स एकच आहे तो म्हणजे तैमुर. त्याची प्रत्येक गोष्ट सोशल मीडीयामध्ये तुफान व्हायरल होते. आता पुन्हा तैमुरच्या बाबतीत एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे तैमुरला टीव्हीची सवय लागू नये यासाठी सैफ आणि मी टी.व्ही पाहत नाही. तो झोपल्यानंतरच आम्ही दोघे टी.व्ही पाहतो असा खुलासा करीनाने एका मुलाखतीत […]

महाराष्ट्र

जागा वाटपाच्या मुद्द्यावर आमचं ठरलंयः उध्दव ठाकरे

केंद्रीय मंत्रिमंडळात एकच अवजड उद्योग खाते दिल्याने आणि नुकतेच चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेसाठी मित्रपक्षांना १८ जागा सोडत उर्वरित जागांवर ५०-५० टक्के जागांचा युतीचा प्रस्ताव जाहीर केल्याने शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे. या पाश्र्वभूमीवर पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारताच ‘तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर नाराजी दिसते का?’ असे म्हणत ठाकरे यांनी विषयाला […]

मनोरंजन

स्टुडंच्याच प्रेमात पडला होता हा अभिनेता

बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता आर माधवनच्या लग्नाला आज 20 वर्ष पुर्ण झाले आहे. त्याने त्याची पत्नी सरीताला लग्नाच्या वाढदिवसाच्या सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत. आणि ती त्याच्यासाठी किती स्पेशल आहे हे सांगितले आहे. माधवनचे वडील टाटा स्टीलमध्ये मॅनेजमेंट एक्झिक्यूटिव्ह होते तर आई सरोज बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होती. अभ्यासात हुशार असलेल्या माधवननं त्यासोबत अनेक छंदही जोपासले […]

क्रीडा

स्टार बॉक्सर मेरी कोम घेणार निवृत्ती !

भारताची स्टार बॉक्सर आणि सहा वेळा जगज्जेता असलेली मेरी कोम निवृत्ती घेणार असल्याचे तिने जाहीर केले आहे. 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला ऑलिम्पिकचे मेडल मिळवून द्यायचे असे मेरी कोमचे स्वप्न आहे.निवृत्तीबद्दल ती म्हणाली की, मला निवृत्त व्हायचे असून 2020 च्या ऑलिम्पिकनंतर हा निर्णय घेईन.

महाराष्ट्र

धक्कादायकःजलसंपदा मंत्र्यांच्याच मतदार संघात जातेय लाखो लिटर पाणी वाया !

संपुर्ण राज्य दुष्काळामुळे पाण्यासाठी कासावीस झाले आहे. मात्र जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या मतदारसंघात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरंदर उपसा योजनेतून 100 दशलक्ष घनफूट पाण्याची गळती सुरु असून तीन महिन्यांपासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र, सरकारी यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. दुष्काळी परिस्थितीत पुरंदर तालुक्यातीळ सुमारे पाऊण लाख लोकसंख्येला 50 […]

देश

मोठा निर्णय; विमा कपंन्यांना सरकार देणार 4 हजार कोटींची भांडवली मदत?

केंद्र सरकार यंदाच्या पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील साधारण विमा कंपन्यांची वित्तीय स्थिती सुधारता यावी म्हणून ४ हजार कोटींची भांडवली मदत घोषित करु शकते. अशी माहिती आहे. या मदतीमुळे साधारण विमा (जनरल इन्श्युरन्स) कंपन्यांना आपली आर्थिक स्थिती सुधारता येईल. तसेच साधारण विमा कंपन्यांच्या प्रस्तावित विलिनीकरणाची प्रक्रियाही सुलभ होऊ शकते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील […]

देश

वाढत्या बेरोजगारीच्या मुद्दावर मोदी सरकार ‘ॲक्शन मोड’मध्ये; उचलले ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली – देशातील वाढती बेरोजगारी आटोक्यात आणण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी बुधवारी मोदींनी कॅबिनेट समितीची स्थापना केली आहे. तसेच मोदी सरकार देशातील ढासळलेल्या आर्थिक स्थितीबाबत देखील गंभीर झाले आहेत. रोजगार निर्मिती आणि आर्थिक सुधारणा यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कॅबिनेट समित्यांचे अध्यक्ष खुद्द पंतप्रधान मोदी असणार […]

महाराष्ट्र

गिरीश बापट यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

लोकसभेवर निवडूण आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे गिरीश बापट आणि उन्मेष पाटील यांनी मंगळवारी (4 जुलै) आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे  दिला आहे. तसेच बापट यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्याकडे दिला आहे. गिरीश बापट पुणे, तर उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहेत. विधानसभा आणि विधान परिषदेचे एकूण 12 […]