देश

अखेर चीन घाबरला; गलवान खोऱ्यातून माघार घेण्यास चीनची सुरुवात

चीनी सैन्य गलवान खौऱ्यामधील हिंसाचाराच्या ठिकाणापासून सुमारे दीड किमी अंतरावरून मागे हटली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या सैन्यानं स्थानांतरणाबाबत सहमती दर्शविली आहे आणि सैन्याने सद्यस्थितीपासून माघार घेतली आहे. गलवान खौऱ्याजवळ आता एक बफर झोन बनविला गेला आहे, जेणेकरून पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडू नयेत. गलवान खोऱ्यात 15 जून रोजी ज्या ठिकाणी दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये चकमक […]

देश विदेश

हिरो सायकलने दिला चीनला झटका; 900 कोटींचा करार रद्द

भारताने आता चीनला धडा शिकविण्याचे ठरवले आहे. भारतातील प्रसिद्ध अशा हिरो सायकल कंपनीने भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे चीनवर बहिष्कार टाकत 900 कोटी रुपयांचा करार रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक कंपन्या आर्थिक डबघाईला आल्या आहेत. पण हिरो सायकल अशा बिकट परिस्थितीतही सुसाट धावत आहे. अलिकडेच हिरो सायकल कंपनीने […]

देश

अरे बापरे! देशात दर तासाला वाढतायेत एक हजार कोरोना रुग्ण

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आता तर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात दर एक तासाला 1 हजार नवे रुग्ण वाढत असल्याची माहिती आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात 24 तासांमध्ये 24 हजार 850 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोनामुळे 613 लोकांचा मृत्यू […]

देश

पबजीच्या वेडापायी मुलाने आई-बापाला 16 लाखाला खड्ड्यात घातलं

लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये पबजीचे वेड दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. पबजीच्या वेडापायी अनेकांनी आपले मानसिक स्वास्थ देखिल बिघडवून घेतले आहे. पबजीच्या वेडापायी एका मुलाने चक्क आपल्या आई-वडीलांना तब्बल 16 लाखाला चुना लावला आहे. पंजाब मध्ये एका अल्पवयीन मुलाने गेम खेळताना या अॅपला खरेदी करण्यासाठी आणि अपग्रेडिंग करण्यासाठी तब्बल 16 लाख रुपये खर्च करून टाकले आहेत. […]

देश

परिक्षा देऊन आलेल्या 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. परिक्षा देऊन आलेल्या 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लॉकडाऊनमुळे स्थगित केलेल्या (Secondary School Leaving Certificate ) SSLC च्या परीक्षा कर्नाटक बोर्डानं घेतल्यानंतर परीक्षा दिलेल्या 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 25 जून पासून ही […]

देश

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची विक्रमी वाढ

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. ही वाढ कमी होण्याचे काही नाव घेताना दिसत नाही. गेल्या 24 तासांत कोराना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 22 हजार 771 नवीन रुग्णांची नोंद झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या 6,48,315 इतकी झाली आहे. यापैकी […]

देश

गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या सैनिकांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

आज सकाळी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी लडाख दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी गलवान खोऱ्यात चीनशी झालेल्या संघर्षात जखमी झालेल्या जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जवानांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं आणि म्हटलं की, त्यांच्या शौर्याची सगळीकडे चर्चा होतेय आणि यापासून येणाऱ्या पुढील पिढ्या खूप काही शिकतील. या दरम्यान हॉस्पिटलमध्येच सैनिकांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा पण दिल्या. […]

देश

दिल्लीत भूकंपाचा हादरा; नागरिकांची पळापळ

दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. काही सेंकद धक्के जाणवत होते. त्यामुळे नागरिकांची पळापळ झाली. दिल्लीत संध्याकाळी  7 च्या सुमारास भूकंप झाला.  इमारती हादरल्या. काही सेकंद धक्के जाणवत राहिल्याने लोकांनी इमारतीबाहेर धाव घेतली. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.5 एवढी नोंदवण्यात आली आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेशातल्या काही भागातही भूकंपाचे झटके बसले आहेत. गेल्या दोन […]

देश

उत्तरप्रदेशातील कायदा, सुव्यवस्था खालावलीः प्रियंका गांधी

उत्तरप्रदेशातील कानपूर येथे गुंडांनी केलेल्या गोळीबारात 8 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था खालावली आहे, असा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे. आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. […]

देश विदेश

‘कोरोनावर परिणामकारक लस बनविण्यासाठी अडीच वर्ष लागतील’

कोरोना व्हायरसवर परिणामकारक लस बनविण्यासाठी अजून अडीच वर्ष लागतील असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी व्यक्त केले आहे. सध्याच्या घडीला करोनावर कोणतंही औषध किंवा उपाय उपलब्ध नाही. जर कोणी असा दावा करत असेल तर त्यांच्याकडे पुरावा मागितला पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. जगभरात अनेक […]