गुन्हेगारी महाराष्ट्र

जळगाव हत्याकांडः समोर आली धक्कादायक माहिती

जळगांव – जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा गावात चार अल्पवयीन बालकांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील ३ संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून आरोपींनी बलात्कार करण्याच्या उद्देशाने चारही बालकांची हत्या केल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या चार बालकांमधील 14 वर्षीय मुलीवर आरोपींकडून […]

गुन्हेगारी

जमीनीच्या वादातून शिक्षकाची हत्या

बार्शीटाकळी येथे युवकांनी धारदार शस्त्राने वार करुन एका शिक्षकाची हत्या केली.हत्या झालेल्या   शिक्षकाचे नाव जुबेर अहेमद खान शफाकत उल्ला खान असून त्यांच्यावर फिरदोस कॉलनी येथील दोन युवकांनी धारदार शस्त्राने कान्हेरी नजीक गुरुवारी सायंकाळी हल्ला केला. या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू झाला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. जुबेर अहेमद खान शफाखत उल्ला खान […]

गुन्हेगारी मनोरंजन

अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांची धाड

बेंगळुरू –  बेंगळुरू पोलिसांनी अंमली पदार्थांच्या प्रकरणात आज हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या घराची झडती घेतली. या प्रकरणाशी संबंधित आणि विवेक ओबेरॉयचा मेव्हणा आदित्य अल्वा याच्या शोधासाठी पोलिसांनी छापा घातला होता. आदित्य अल्वा हा ड्रग्ज प्रकरणातील वॉन्टेड आहे, असे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले. आदित्य अल्वा हा विवेक ओबेरॉयचा नातेवाईक आहे आणि तो विवेकच्या घरी असल्याची […]

गुन्हेगारी देश महाराष्ट्र

अर्णब गोस्वामी कायदेशीर पेचात अडकण्याची दाट शक्‍यता

मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना दुसऱ्यांदा हक्‍कभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर विधिमंडळाने गोपनीयतेच्या अटीवर दिलेले कार्यवृत्त परवानगीशिवाय न्यायालयात सादर केल्याचा आरोप आहे. त्यांनी दोन वेळा विधिमंडळाचा हक्कभंग केल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. विधिमंडळाने पावसाळी अधिवेशनात अर्णब गोस्वामी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

गुन्हेगारी महाराष्ट्र

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना ३ महिन्यांची शिक्षा

अमरावती – अमरावती न्यायालयाने आज महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना आठ वर्षांपूर्वी घडलेल्या पोलीस मारहाण प्रकरणात ३ महिन्यांची शिक्षा व १५ हजारांचा दंड ठोठावला आहे. अमरावतीतील अंबादेवी मंदिराजवळ घडलेल्या या घटनेत ठाकूर यांना उल्हास रौराळे या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणात ठाकूर यांच्यासोबतच त्यांचा वाहनचालक व दोन कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात […]

गुन्हेगारी विदेश

पाकिस्तानात धर्मगुरूंची गोळ्या झाडून हत्या

कराची – पाकिस्तानातील प्रभावशाली सुन्नी मुस्लिम धर्मगुरूची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. कराची जामिया फारुकीया शिक्षण संस्थेचे पमुख डॉ. आदिल खान यांच्यावर काल सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. कराची शहरामध्ये झालेल्या या घटनेत मौलाना डॉ. आदिल खान यांच्यासह त्यांच्या चालकाचाही मृत्यू झाला, असे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. फैजल कोलोनीतील कराची जामिया फारुकीया […]

गुन्हेगारी मनोरंजन

SSR प्रकरण : सीबीआयच्या तपासाची बदलणार दिशा…..

नवी दिल्ली : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युचे कोडे आता सुटेल असे वाटते आहे. त्याची हत्या झाली नसून ती आत्महत्याच आहे असे एम्सच्या डॉक्टरांच्या टीमने सीबीआयला सोपवलेल्या अहवालामध्ये स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुशांतने आत्महत्या केली नाही तर त्याची हत्या झाली आहे असा दावा अनेकजण करत होते. परंतू आता एम्सच्या डॉक्टरांनी सोपावलेल्या अहवालामुळे सीबीआयच्या तपासाची […]

गुन्हेगारी मुंबई

खोटे क्यूआर कोड बनवून देणा-याला अटक…

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्याकरता १५ जूनपासून फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरताच लोकल ट्रेन सुरु करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांशीवाय दुसरे केणीही प्रवास करू नये हा त्यामागील उद्देश्य होता. त्याकरता महाराष्ट्र सरकारने क्यूआर कोड सिस्टिम चालू केली होती. परंतू सरकारच्या या मोहिमेलाही एका ईसमाने पैसा कमवण्याचे साधन बनवले. त्याने नकली […]

गुन्हेगारी मनोरंजन

ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिकासोबत A,R,S ही नावे कोणाची?…

मुंबई – दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाला मिळालेल्या अमली पदार्थाच्या वळणाने अनेक दिग्गजांच्या नाकी नऊ आणले आहे. याबाबत तपासात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला अनेक धागे दोरे मिळत आहेत. हा तपास पुढे जात असताना आता सुप्रसिध्द अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या तिघींची कसून चौकशी सुरू आहे. यामध्ये आता आणखी तीन दिग्गज […]

गुन्हेगारी मनोरंजन

अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ

  मुंबई – सुप्रसिध्द दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यप यांच्यावर अभिनेत्री पायल घोष हीने आपल्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याकरता वर्सोवा पोलिसांनी अनुराग कश्यप यांना तसा समन बजावला आहे. त्यामुळे अनुराग कश्यप यांची अडचण आता चांगलीच वाढली आहे. अभिनेत्री पायल […]