विदेश

भारतापाठोपाठ आता अमेरिकाही चिनी ॲप्सवर बंदी घालण्याच्या तयारीत !

लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने 29 जून रोजी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी ॲपसह एकूण 59 ॲपवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता अमेरिकाही चिनी ॲप्सवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी अमेरिका चिनी ॲप्सवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे. फॉक्स न्यूजशी […]

विदेश

अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना बसणार मोठा फटका; ट्रम्प घेणार ‘हा’ निर्णय

अमेरिकेत शिकत असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे. कोरोना संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण फक्त ऑनलाइन होत आहे अशा सर्व परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे. CNNने दिलेल्या वृत्तानुसार, इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंटने सोमवारी सांगितले की रिस्क ऑपरेशनचा भाग म्हणून अमेरिका या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात परत पाठविण्याची तयारी करीत आहे. […]

देश विदेश

हिरो सायकलने दिला चीनला झटका; 900 कोटींचा करार रद्द

भारताने आता चीनला धडा शिकविण्याचे ठरवले आहे. भारतातील प्रसिद्ध अशा हिरो सायकल कंपनीने भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे चीनवर बहिष्कार टाकत 900 कोटी रुपयांचा करार रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक कंपन्या आर्थिक डबघाईला आल्या आहेत. पण हिरो सायकल अशा बिकट परिस्थितीतही सुसाट धावत आहे. अलिकडेच हिरो सायकल कंपनीने […]

विदेश

जगातील पहिलं सोन्याचं हॉटेल पाहिलंत का?

व्हिएतनाममध्ये जगातील पहिलं सोन्याचं हॉटेल पर्यटनासाठी खुलं करण्यात आलं आहे. राजधानी हनोई येथे हे अनोखे हॉटेल आहे. जगभरात कोरोनाचं संकट असताना व्हिएतनाममध्ये मात्र गोल्ड प्लेटपासून बनवलेलं एक हॉटेल खुलं करण्यात आलं आहे. सोन्यापासून तयार करण्यात आलेलं हे जगातील पहिलं हॉटेल असल्याचा दावा करण्यात आला आहे. डोल्से हनोई गोल्डन लेक (Dolce Hanoi Golden Lake) या नावाचं […]

विदेश

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना कोरोनाची लागण

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांना हळू हळू ताप येऊ लागला. अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं. ‘माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं मी घरातून आपलं काम करत आहे. पण मी बरं व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थना करा.’ असं कुरेशी यांनी […]

देश विदेश

‘कोरोनावर परिणामकारक लस बनविण्यासाठी अडीच वर्ष लागतील’

कोरोना व्हायरसवर परिणामकारक लस बनविण्यासाठी अजून अडीच वर्ष लागतील असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी व्यक्त केले आहे. सध्याच्या घडीला करोनावर कोणतंही औषध किंवा उपाय उपलब्ध नाही. जर कोणी असा दावा करत असेल तर त्यांच्याकडे पुरावा मागितला पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. जगभरात अनेक […]

विदेश

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात ‘या’ देशाने केले अटक वॉरंट जारी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह आणखी काही जणांविरोधात इराणने अटक वॉरंट जारी केले आहे. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी  3 जानेवारीला ठार झाला होता. अमेरिकेने इराकची राजधानी बगदादमध्ये हा हल्ला केला होता. या हल्ल्याला अध्यक्ष ट्रम्प आणि इतर 30 अधिकारी जबाबदार असून त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरावा अशी […]

मनोरंजन विदेश

पाकिस्तानच्या विमान अपघातात प्रसिध्द मॉडेलचा मृत्यू

पाकिस्तान मध्ये इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातात प्रसिध्द मॉडेलचा देखील मृत्यू झाला आहे. पाकिस्तानात कराची विमानतळाच्या दिशेनं निघालेल्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान कोसळताच त्याला आग लागली. या विमानात जवळपास 100 प्रवासी होते अशी माहिती समोर येत आहे. विमान दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला किंवा वाचले याची माहिती मिळालेली नाही. मात्र […]

विदेश

मास्क न घातल्यास ‘या’ देशात होणार अटक

कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर केला जातो. पण काही जण मास्क वापरताना दिसत नाही. त्यामुळे या देशात जे मास्क वापरणार नाहीत त्यांना अटक केली जाणार आहे. स्पेनमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. मास्क न लावलेल्यांना अटक केली जाणार आहे आणि दंडही भरावा लागणार आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक आहे, अशी घोषणा स्पेननं […]

विदेश

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प घेतात ‘हे’ औषध

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका औषधाचे सेवन करत आहेत. हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या काही काळ घेतल्या असल्याची कबुली डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली  आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत  याबाबत माहिती दिली. ट्रम्प यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हायड्रोक्लोरोक्विन हे औषध घेत असल्याचे सांगितले. हायड्रोक्लोरोक्विन औषधाला काही देशांमध्ये बंदी घातल्यानंतर अमेरिकेत मात्र याचा वापर […]