महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक; मुंबईत चीन पेक्षा अधिक कोरोना रुग्ण

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईने कोरोना रुग्णांच्या संख्येत आता चीनलाही मागे टाकलं आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या 85 हजार 320 इतकी आहे, तर मुंबईत ही संख्या आता 85 हजार 724 वर पोहोचली आहे. मुंबईत एकूण 85 हजार 270 कोरोनाग्रस्त रुग्ण असून यापैकी 4 हजार 899 जणांचा मृत्यू झाला आहे. […]

महाराष्ट्र मुंबई

मराठी तरुणांसाठी खुशखबर; ‘महाजॉब्स’ पोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मराठी तरुणांसाठी ठाकरे सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी एमआयडीसीच्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. http://mahajobs.maharashtra.gov.in या पोर्टलवर भेट दिल्यानंतर तरुणांना रोजगाराच्या संधींविषयी माहिती मिळणार आहे. राज्यातील उद्योगात मराठी मुलांना नोकरी मिळावी, हा या पोर्टलचा उद्देश असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई […]

महाराष्ट्र मुंबई

राज्यात 24 तासांत 30 पोलिसांना कोरोनाची लागण; 4 जणांचा मृत्यू

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना योध्द्यांपैकी एक असलेल्या पोलिसांना देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत 30 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे तर 4 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक अधिकारी आणि तीन पोलिस कॉन्स्टेबलचा समावेश आहे. सध्या मुंबईत 114 पोलिस अधिकारी आणि 956 पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित […]

महाराष्ट्र मुंबई

‘ठाकरे सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्या आहेत’

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. ऑक्टोबरपर्यंत वाट्टेल ती किंमत मोजून सरकार पाडण्याच्या पैजा लागल्या आहेत, पण हे केवळ स्वप्नरंजन आहे. सरकारला कोणताही धोका नाही. असा खुलासा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नियुक्ती हा सध्या […]

महाराष्ट्र मुंबई

मुंबई, कोकणासह राज्यात अतिवृष्टीचा इशारा

शुक्रवार पासून पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत शनिवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू झाली होती. शहराच्या तुलनेत पश्चिम आणि पूर्व उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ठाणे-दिवा-डोंबिवली-कल्याण-भिवंडी परिसरात रात्रभर पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.उत्तर कोकणात रेड अलर्ट, दक्षिण कोकण, […]

महाराष्ट्र मुंबई

उबरने बंद केलं मुंबईतील ऑफीस

खासगी प्रायव्हेट टॅक्सी सर्व्हिस देणारी आघाडीची कंपनी उबरने त्यांचं मुंबईतील ऑफीस बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटकाळात उबरने त्यांच्या 14 टक्के अर्थात 3700 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. गेल्या महिन्यात उबरने या कर्मचाऱ्यांना झूम (Zoom) व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून असे सांगितले होते की, कोव्हिड-19 पँडेमिक […]

महाराष्ट्र मुंबई

आज मुंबईसह सहा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

काल मुंबईत चांगला मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये आणि रस्त्यावरही पाणी साचले होते. आजही मुंबईसह सहा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि नाशिक या 6 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग […]

महाराष्ट्र मुंबई

मुंबईत मुसळधार पाऊस; या भागात साचले पाणी

मुंबईत आज मुसळधार पाऊस झाला आहे. शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अंधेरीमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. अंधेरीच्या सबवेमध्ये […]

महाराष्ट्र मुंबई

शिवभोजन थाळी आता आणखी तीन महिने 5 रुपयात मिळणार

लॉकडाऊन संपले असले तरी अनेक गोर-गरीब नागरिकांच्या हाताला अद्याप काम मिळालेले नाही. त्यामुळे अशा नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आणखी तीन महिने शिवभोजन थाळी 5 रुपयात मिळणार आहे. राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी आणखी तीन महिने पाच रुपयांमध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक […]

महाराष्ट्र मुंबई

आता 30 मिनिटात होणार कोरोनाचे निदान; मुंबई महापालिकेचे ‘हे’ खास मिशन

आता कोरोनाचे निदान अवघ्या 30 मिनिटात होणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने एक खास मिशन हाती घेतले आहे. महानगरपालिकेने (BMC) आता “मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग” हाती घेतलं आहे.  यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अवघ्या अर्ध्या तासात कोरोना चाचणीचा अहवाल मिळणार आहे. त्यासाठी अँटीजेन टेस्टिंगच्या (Antigen Tests) एक लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. तसेच शासनाने […]