पुणे महाराष्ट्र

अजितदादांचा मोठा निर्णय; पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी 4 आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती

पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी 4 आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत टेस्टिंग इन्चार्ज म्हणून आयएएस अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. या चारही अधिकार्‍यांकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा, ग्रामीण आणि कॅन्टोनमेंट हद्दीतील कोरोना नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी […]

पुणे महाराष्ट्र

धक्कादायक; पुण्यातील 6 नगरसेवकांना कोरोनाची लागण

पुण्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ आता  विरोधी पक्षनेते यांच्यासह 6 नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. महापौरांच्या संपर्कात आलेल्या नेते आणि अधिकाऱ्यांना होम क्वारंटाइन  होण्यास सांगण्यात आलं आहे. यात आयुक्तांसह अनेक ज्येष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांचाही समावेश […]

पुणे महाराष्ट्र

मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक; आंदोलनाचा दिला इशारा

मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. ‘उद्या मराठा आरक्षणाची सुनावणी आहे. निकाल विरोधात गेला तर 9 ऑगस्टपासून मराठा क्रांती मोर्चा कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध पाळून रस्त्यावर उतरेल,’ असा इशारा पुण्यात आज झालेल्या पत्रकार परिषदेतून क्रांती मोर्चाने दिला आहे. मराठी क्रांती मोर्चाने सारथी संस्थेवरुन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. […]

पुणे महाराष्ट्र

भाजपाच्या ‘या’ माजी आमदारांना कोरोनाची लागण

भाजपाचे पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघाचे  माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट  करुन याबाबत माहिती दिली. दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची #COVIDー19 ची तपासणी करून घेतली असता तपासणी अहवाल पॉसिटीव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी […]

पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक ‘दत्ताकाकांचं’ कोरोनामुळे निधन

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक आणि महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. दत्ता साने यांना कोरोनाची लागण तर झालीच होती पण त्याचबरोबर त्यांना निमोनियाची देखील लागण झाली होती. त्यामुळे त्यांची प्रकती आणखीनच खालावली होती. आज अखेर त्यांचं निधन झाले. त्यांच्या […]

पुणे महाराष्ट्र

आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण

पुणे जिल्ह्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज त्यांचा कोरोना पॉझिटीव्हचा अहवाल आला आहे. त्यांना बिर्ला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी स्वतः त्यांच्या मतदारसंघात जाऊन अनेकदा परिस्थितीचा आढावा घेतला होता. […]

पुणे महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड मध्ये मास्क न घालणाऱ्यांना 1 हजार रुपये दंड

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका आयुक्त आणि पोलिसांनी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवास करताना मास्क वापरणं बंधनकारक आहे. विना मास्क कोणीही आढळल्यास  दंड आकारण्यात येईल अशी सूचना विभागीय आयुक्त […]

पुणे महाराष्ट्र

यंदाचा पायी पालखी सोहळा रद्द

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या आषाढी वारीचा पालखी सोहळा इतिहासात पहिल्यांदाच रद्द करावा लागला आहे. मात्र माऊली आणि इतर संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मात्र नेण्यात येणार आहेत. यंदाच्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा पादुका घेऊन कमी लोकांमध्ये वाहन,  हेलिकॉप्टर किंवा विमान या तीन पर्यांया पैकी एकाद्वारे त्यावेळीच परिस्थिती पाहून, पंढरपूरच्या […]

पुणे महाराष्ट्र

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या 7012 वर

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णांची संख्या 7012 वर पोहोचली आहे. पुण्यात काल (28 मे) दिवसभरात 369 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात एकूण 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 310 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

पुणे महाराष्ट्र

पुण्यात एकाच दिवसात 291 नवे रुग्ण वाढले; आकडा 6 हजार पार

मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज दिवसभरात पुण्यात 291 नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आता पुण्याची एकूण रूग्णसंख्या 4,398 वर पोहोचली आहे. आज 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. देशभरात कोरोना विषाणूचे आजपर्यंत एक लाख 18 हजाराच्या पुढे रुग्ण संख्या गेली आहे. तर […]