देश

अबब; ट्रक चालकाला तब्बल 86 हजार 500 रुपयांचा दंड

odisha truck driver fined

नवीन मोटार वाहन कायदा 1 संप्टेबर पासून देशात लागू करण्यात आला आहे. वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या चालकांकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात येत आहे. या दंडाची रक्कम पाहून सगळ्याचे डोळे चक्रावले आहेत. याच नियमांची आणि दंडाची चर्चा सगळीकडे ऐकायला मिळत आहे.  मात्र ओदिशामधील एका ट्रकचालकाला तब्बल 86 हजार 500 रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी ठोठावला आहे. या दंडाच्या रक्कमेने आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर या इतक्या मोठ्या दंडाच्या पावतीचे फोटो व्हायरल होत आहेत.

अशोक जाधव असे या ट्रक चालकाचे नाव आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून या ट्रक चालकाला चक्क ८६ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. संभलपूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही कारवाई केली आहे.

जाधव चालवत असलेल्या या ट्रकचा क्रमांक एनएल ०१ जी १४७० आहे. हा ट्रक नागालँडमधील आहे. मात्र या चालकाने पोलिसांबरोबर पाच तास हुज्जत घालती आणि काही कागदपत्र सादर केल्यानंतर त्याला ७० हजारांचा दंड भरण्यास सांगण्यात आले. ३ सप्टेंबर रोजी हा सर्व प्रकार घडला. या चालकाने तीन दिवसानंतर दंडाची रक्कम आरटीओ कार्यालयात भरल्यानंतर ट्रक त्याच्या ताब्य़ात देण्यात आला.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of