देश

अमित शाह उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज

भाजप अध्यक्ष अमित शाह लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

अमित शाहांनी फोनवरुन दिलेलं निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलं आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह गांधीनगरमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यासाठी त्यांनी अर्ज भरण्याची तयारी सुरु केली आहे. उद्या म्हणजेच 30 मार्चला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अर्ज दाखल करण्याआधी अमित शाह आपल्या मतदारसंघात रोड शो करुन शक्तीप्रदर्शन करणार आहेत. गांधीनगरच्या नारणपुरामधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुन रोड शोला सुरुवात होईल.

4 किमी अंतराच्या या रोड शोमध्ये त्यांच्यासोबत भाजपचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित असतील. यानंतर ते सभेला संबोधित करणार आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of