new motor vehicle act 2019 auto driver gets fined for not wearing seat belt
देश

अरेच्चा ! रिक्षाचालकावर चक्क सीट बेल्ट न घातल्यामुळे कारवाई

फोरव्हीलरला सीट बेल्ट असतो हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मात्र चक्क रिक्षाचालकाने सीट बेल्ट लावला नाही त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

बिहारच्या मुझफ्फरापूर येथे एका रिक्षाचालकावर चक्क सीट बेल्ट न घातल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. रिक्षाला सीटबेल्ट नसतो तरीही अशाप्रकारची कारवाई करण्यात आल्याचं समोर आलं आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार शनिवारी(दि.14) मुझफ्फरपूरच्या सराय परिसरात वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला रोखलं. पण, त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचं पाहून पोलिसांनी त्याच्यावर सर्वात कमी दंड आकारण्याचं निश्चित केलं. त्यानंतर, कायद्यातील नव्या तरतुदींनुसार सीट बेल्ट न घातल्यास 1000 रुपये ही सर्वात कमी दंडाची रक्कम त्याच्याकडून आकारण्यात आली.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of