देश

काश्मीरमधून कलम 370 हटविणे असंवैधानिकः प्रियंका गांधी

जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यामुळे कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

मोदी सरकारवर टीका करत त्यांनी या संदर्भात आपली पहिलीच प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली आहे. जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवणं असंवैधानिक आहे अशी टीका प्रियंका यांनी केली आहे.

प्रियंका गांधी या सोनभद्र येथील उभ्मा गावाच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अनुच्छेद ३७० हटवणं कायद्याला धरुन नसल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसने अनुच्छेद ३७० बाबत जी भूमिका घेतली आहे तीच माझी भूमिका आहे. अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आझाद यांनी जे संसदेत म्हटलं होतं तेच मलाही योग्य वाटतं आहे असंही प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of