देश

केरळमधील मच्छिमारांना नोबल पुरस्कार द्या : शशी थरूर

तिरुअंतपुरम

गेल्या वर्षी केरळमध्ये आलेल्या भीषण महापुरात अनेक लोकांचा जीव वाचविणाऱ्या मच्छीमारांना शांततेचा नोबल पुरस्कार देण्याची मागणी काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केली आहे. तिरुवंतनपुरम येथून लोकसभा सदस्य असलेला थरुर यांनी नॉर्वेमधील नोबल पुरस्कार समितीचे अध्यक्षांना या संदर्भात पत्र लिहिले आहे.

केरळमध्ये आलेल्या महापुराच्या वेळी येथील मच्छीमारांना आपल्या पोटापाण्याची सोय लावणाऱ्या जहाजांचा आणि जीवाची पर्वा न करता अनेक नागरिकांचा जीव वाचवला. येथील स्थानिक मच्छिमारांच्या भागातील माहितीमुळे बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात मदत झाली. त्यामुळे त्यांना नोबल पुरस्कार द्यावा अशी मागणी थरुर यांनी केली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of