देश

केवळ एक मिनिट उशीर झाला, उमेदवारी अर्ज भरता नाही आला !

वेळेची किंमत जो करत नाही, त्यांची वेळ किंमत करत नाही असे बोलले जाते. एक उमेदवार केवळ एक मिनिट उशीरा आला आणि उमेदवारी अर्ज भरता नाही आला. शुक्रवारी निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. यामध्ये काही नेतेमंडळी एक ते पाच मिनिट उशिर झाल्यानं अर्ज भरू शकले नाहीत.

क्कलकुवा मतदारसंघातून आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या मात्र, 03:01 अर्थात एक मिनिट उशीर झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना माघारी पाठवले. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

कर्नाल जिल्ह्यातील नीलोखेडी आणि कर्नाल विधानसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्यासाठी पोहचलेल्या तीन उमेदवारांना उशिरा पोहचण्याचा फटका बसला आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, तीन नेत्यांना पोहचण्यास उशिर झाला.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of