देश मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,जया प्रदा यांना भाजप उत्तरप्रदेशमधून रामपूर येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.

तर रामपूर येथून समाजवादी पक्षातर्फे आझम खान उमेदवार आहेत.जया प्रदा म्हणाल्या कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे. मी आजपर्यंत जे कामे केले ते मनापासून केले आहे. यावेळी त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांचेही आभार मानले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of