गुन्हेगारी देश

तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची हत्या

हुगळी – पश्‍चिम बंगालमधील चुरचुरा गावात तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची शनिवारी सकाळी हत्या करण्यात आली. त्याला गोळी घालून मारले. त्यामुळे तृणमूल कॉंग्रेसने या भागात २४ तासांच्या बंदचे आवाहन करण्यात आले होते.

बंदमुळे शहराच्या काही भागामधील दुकाने आणि कार्यालये बंद होती.पंचायत प्रधान आणि तृणमूलच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या नीतू राम यांचे पती दिलीप राम यांची काल सकाळी बांदल जंक्‍शन रेल्वे स्टेशनमध्ये काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरच ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of