देश

दहशतवादाविरुध्द भारताच्या प्रयत्नांना मोठे यश; मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित!

भारतामध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आज आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढ्याला  आज मोठे यश आले आहे.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी यासंदर्भात ट्विट करुन ही माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या १२६७ समितीकडून आयएसआयएल आणि अल-कायदा यादीमध्ये मसूद अझहरचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून समावेश करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. युएनएससीत ज्यांनी भारताला साथ दिली त्या सर्वांचे त्यांनी आभारही मानले आहेत. फ्रान्स सरकारनेही या घोषणेचे जाहीर स्वागत केले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of