देश

देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली. त्यांनी दुपारी 12 वाजून 07 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२ मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ’ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of