देश

पाकच्या नापाक हरकती; जैशचा म्होरक्या मसूद अजहरची सुटका

पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरची तुरुंगातून सुटका केली आहे. अशी माहिती गुप्तचर विभागाने सरकारला दिली आहे. पाकिस्तान पुन्हा मसूद अझहरचा वापर भारताविरोधी दहशतवादी हल्ल्यासाठी करण्याची शक्यता वर्तवली आहे.

‘पाकिस्तान अतिरेक्यांना अटक करतो असं सांगून कारवाईचा देखावा करत आहे. अमेरिका पाकिस्तानच्या या नापाक कारवाईवर विश्वास ठेवते. मात्र काही काळानंतर पाकिस्तान अतिरेक्यांची सुटका करून दहशतवादाला खतपाणी घालत आहे. त्यामुळे भारताविरोधात पुन्हा एकदा मसूद अझरचा वापर पाकिस्तान करू शकतो अशी आता भीती निर्माण झाली आहे’. अशी प्रतिक्रिया सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर त्याविरोधात पाकिस्तान येणाऱ्या काळात सियालकोट-जम्मू आणि राजस्थान सेक्टरमध्ये  दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of