देश

बळीराजा लढणार मोदींच्या विरोधात

नवी दिल्ली – आपल्या मागण्यांसाठी दिल्लीत अनेक दिवस आंदोलन करुन देखील मागण्या मान्य न झालेले तामिळनाडूचे शेतकरी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातच वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
मोदींविरोधात हे शेतकरी वाराणसी मतदारसंघातून १११ नामांकने दाखल करणार आहेत, अशी माहिती तामिळनाडूचे शेतकरी नेते पी. अय्याकन्नू यांनी दिली.

शेतमालाला योग्य किंमत देण्याचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट करावे, असे अय्याकन्नू यांनी सांगितले. जेव्हा आमच्या सर्व मागण्या जाहीरनाम्यात समाविष्ट होतील तेव्हापासून आम्ही मोदींच्या विरोधात लढणे थांबवू, असेही अय्याकन्नू यांनी स्पष्ट केले.

मात्र, मागण्या पूर्ण न झाल्यास मोदींच्या विरोधात निवडणूक लढवू, असेही ते म्हणाले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of