देश

मनमोहन सिंग यांनी राज्यसभेसाठी केला अर्ज दाखल

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभा सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज त्यांनी राजस्थानातून दाखल केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या निधनानंतर रिक्‍त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर 26 ऑगस्टला पोटनिवडणूक होणार आहे. संख्याबळामुळे काँग्रेसला पूर्ण विश्‍वास आहे. त्यामुळे मनमोहन सिंग यांचा विजय नक्‍की मानला जात आहे. मनमोहन सिंग यांचा राज्यसभेचा कार्यकाल १४ जूनला संपुष्टात आला होता. ते आसाममधून राज्यसभेवर निवडून गेले होते.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of