देश महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणास तुर्तास स्थगिती नाही,मात्र…

नवी दिल्ली – मराठा आरक्षणाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकांवर आज सुनावणी झाली. यात सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार दिला आहे.

दोन याचिकांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्य पीठापुढे शुक्रवारी महत्त्वपूर्ण सुनावणी झाली.सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षणाला स्थगिती मिळू नये, यासाठी माजी अ‍ॅटर्नी जनरल व ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकिलांनी बाजू मांडली.

आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केलेल्या याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी केली.सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. २ आठवड्यांनंतर आरक्षणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली. दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of