देश

मोदींच्या हस्ते होणार राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकाचे लोकार्पण

सुरत – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्ष आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरामधील सुरत आणि नवसारी दौरा करणार आहेत. ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षानिमित्त उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकाचे लोकार्पण करणार आहे.

याआधी सुरत विमानतळावर टर्मिनल इमारतीच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल.
नवसारी जिल्ह्याच्या दांडी या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षानिमित्त उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होईल. पंतप्रधान या स्मारकाला भेट दिल्यावर जनतेशी संवाद साधतील.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of