देश

या राज्यात भाजप उतरवणार नवीन उमेदवार

छत्तीसगड – देशामध्ये लोकसभा निवडणूका निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून लोकसभेसाठी उमेदवार घोषित करण्याची लगबग सुरू आहे.

अशातच आज छत्तीसगडमध्ये भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रमणसिंग यांनी आज माहिती दिली.

ते म्हणाले की, राज्यामध्ये भाजपद्वारे लोकसभेसाठी उभा करण्यात येणारे सर्व उमेदवार नवीन असणार आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या खासदारकीच्या उमेदवारांना यावेळी पक्षाकडून तिकीट देण्यात येणार नाही असे देखील त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of