देश

विमान नको, लोकांना भेटण्याचे स्वातंत्र द्याः राहुल गांधी

विमान नको, आम्हाला लोकांना भेटण्याचे स्वातंत्र द्या अशा शब्दात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात जम्मू-काश्मीरमध्ये काय चाललं आहे, याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, असं आव्हान राहुल यांनी दिलं होतं. त्याला मलिक यांनी प्रत्युतर दिलं होतं. सांप्रदायिक दृष्टीकोनातून कलम 370 हटवण्यात आलेलं नाही. त्यामुळे मी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्याचं निमंत्रण देतो. त्यासाठी मी विमानदेखील पाठवेन. तुम्ही स्वत: परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि मगच बोला. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. त्यामुळे अशा प्रकारची बेजबाबदार विधानं तुम्हाला शोभत नाहीत, असं मलिक म्हणाले होते.

राज्यपाल मलिक यांच्या आमंत्रणाला राहुल गांधी यांनी ट्विटरवरून उत्तर दिले आहे. राहुल गांधी म्हणाले, आदरणीय राज्यपाल मलिक, जम्मू काश्मीर आणि लडाखला भेटण्याचे आमंत्रण दिले, त्याबद्दल आभारी आहे. विरोधीपक्ष नेत्यांच्या शिष्टमंडळासह मी काश्मीरला येईल. आम्हाला विमानाची गरज नाही. पण, काश्मीर खोऱ्यात मुक्तपणे फिरण्याची, लोकांशी संवाद करण्याची तसेच मुख्य प्रवाहातील नेते आणि जवानांशी बोलण्याची शाश्वती द्या, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of