देश महाराष्ट्र

सुशीलकुमारांनी आणला हिंदू दहशतवाद शब्द -मोदी

आज वर्ध्यात नरेंद्र मोदी यांनी सभा घेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच नारळ फोडल. त्यावेळी त्यांनी शरद पवारांसह सुशीलकुमार शिंदे यांच्यावर देखील टीका केली. मोदी म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद शब्द आणला.

मोदी म्हणाले की, “वोट बँकेच्या राजकारणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. या देशाच्या कोट्यवधी लोकांवर हिंदू दहशतवादाचा डाग लागवण्याचा प्रयत्न काँग्रेसनेच केला आहे.

सुशीलकुमार शिंदे केंद्रात मंत्री असताना, त्यांनी याच महाराष्ट्राच्या भूमीवर हिंदू दहशतवादाची चर्चा केली होती. काही दिवसांपूर्वीच कोर्टाचा निकाल आला आणि या निकालामुळे काँग्रेसच्या कटाचं सत्य देशासमोर आलं.

काँग्रेसने हिंदूंचा जो अपमान केला आहे, कोट्यवधी जनतेला जगासमोर कमी लेखण्याचं जे पाप केलं आहे, अशा काँग्रेसला माफ करता येणार नाही.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of