देश विदेश

अमेरिकेत कोरोनामुळे 1 लाख 40 हजार रुग्णांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंद अमेरिकेत होत आहे. शनिवारी अमेरिकेत कोरोनामुळे मृतांची संख्या 1,40,000 वर पोहोचली आहे.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जून महिन्यापासून दावा करीत आहेत की, कोरोनाचा प्रसार हळूहळू थांबला आहे. परंतु असे दिसून येत आहे की बर्‍याच ठिकाणी नवीन रुग्ण वाढत आहेत आणि संसर्ग झपाट्याने होत आहे. रॉयटर्सच्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. एका आठवड्यात सुमारे 5 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेच्या शेजारील देश कॅनडामध्ये कोरोना नियंत्रणात येत आहे. येथे आतापर्यंत 8800 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of