देश

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षीची अमरनाथ यात्रा रद्द

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून यावर्षीची अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. श्रीअमरनाथ श्राइन बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

यावर्षीची अमरनाथ यात्रा 21 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान ही यात्रा सुरू राहणार होती. याआधी जूनमध्ये श्राइन बोर्डाने बालटाल भागातून यात्रेचा मार्ग निश्चित केला होता. पण रस्ता पूर्णपणे तयार नसल्याने त्याला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर 21 जुलैपासून यात्रा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अखेर यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रेसाठी याठिकाणी कोविड रुग्णालय देखील उभारण्यात आलं होतं.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of