देश

अमेरिका-इराणमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

अमेरिकेने इराकची राजधानी असलेल्या बगदादच्या विमानतळावर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाले आहेत. त्यामुळे अमेरिका आणि इराण मध्ये तणाव निर्माण झाला आहे, त्याचा थेट परिणाम भारतातील नागरिकांच्या खिशावर होणार आहे.

पेट्रोल – डिझेल महाग झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. भाज्या, फळं, दूध अशा वस्तूंच्या किंमती वाढू शकतात, असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. याचा परिणाम इतर देशांसह भारतावरही होण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते. भारत अरब देशांसह इराणमधूनही क्रूड ऑइलची आयात करत होता. मात्र, अमेरिकेनं घातलेल्या निर्बंधानंतर भारताने इराणकडून तेल घेणं बदं केलं.

सोन्यामध्ये तेजीचं प्रमाण आजही कायम होतं. आठवडा संपताना सोन्याचे दर 752 रुपये प्रतितोळा झालेत. त्याचवेळी चांदीच्या भावात 960 रुपयांची वाढ झालीय.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू ओढवल्याने आखाती देशात तणाव वाढलाय. या पार्श्वभूमीवर सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढलाय. त्यामुळे सोनं महाग झालंय.

 

 

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of