andhra pradesh tourist boat capsizes in godavari river
देश

गोदावरी नदीत बोट उलटली; 11 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील देवीपटनम येथे गोदावरी नदीत 61 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण बुडाले आहेत. घटनास्थळी ३० जवानांची एनडीआरएफची दोन पथकं दाखल झाली असून बुडालेल्या पर्यटकांना शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

बुडालेल्यांपैकी आत्तापर्यंत २३ जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मृतांच्या कुटूंबीयांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of