देश

लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर

भारत-चीनमध्ये लडाख सीमा वादावरुन तणाव कायम आहे. या पार्श्वभूमीवरुन लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर आहेत.

चीनशी झालेल्या तणावाच्या परिस्थितीत लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे लेह येथे पोहोचले. त्यांनी एकूण परिस्थितीची माहिती घेतली. याव्यतिरिक्त, त्यांनी लेहच्या सैन्य रुग्णालयात भेट दिली आणि जखमी सैनिकांना प्रोत्साहन केले.

सूत्रांच्या माहितीनुसार पेंगंग तलाव आता भारत आणि चीनमधील वादाचा मुख्य मुद्दा बनत चालला आहे. चीनच्या फिंगर 4 येथे सुरु असलेल्या बांधकामावर भारतीय सैन्याचा सर्वाधिक आक्षेप आहे. 5 मे रोजी पेंगाँग तलाव येथे भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये पहिली झटापट झाला. भारत तणाव कमी करण्याच्या बाजुने आहे.

गेल्या आठवडयात हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी लडाख व श्रीनगरला भेट देऊन भारतीय हवाई दलाच्या सज्जतेचा आढावा घेतला होता. चीनने कुठलीही आगळीक केल्यास त्याला सडेतोड उत्तर देण्यास सज्ज असल्याचे त्यांनी अलीकडे म्हटले होते

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of