देश

खासदारांच्या पगारात एक वर्षासाठी होणार 30 टक्के कपात

खासदारांच्या पगारात एक वर्षासाठी 30 टक्के कपात होणार असल्याचे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. संसद सदस्यांचे वेतन, भत्ता आणि निवृत्तीवेतन दुरुस्ती विधेयक 2020 लोकसभेत मंजूर झाले आहे. यामुळे लोकसभा खासदारांच्या वेतन, भत्ता आणि निवृत्ती वेतनात 30 टक्के कपात करण्यात येणार आहे.

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ता आणि निवृत्तीवेतन अध्यादेश 2020 याच्या जागी हे विधेयक मांडण्यात आलं. सभागृहातील बहुतांश खासदारांनी या विधेयकाला सहमती दर्शवली. मात्र, खासदार निधीत कपात करू नये, अशी मागणी काही खासदारांनी केली. दरम्यान, संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ता आणि निवृत्तीवेतन अध्यादेशाला गेल्या 6 एप्रिलला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली होती. 7 एप्रिलपासून हा अध्यादेश लागू करण्यात आला होता.

तृणमूल काँग्रेसचे आणखी एक खासदार सौगत रॉय म्हणाले, जेवढे पैसे असतील तेवढे आपण खासदारांकडून घेऊ शकता. आपण आमचा पूर्ण पगारही घेऊ शकता. मात्र, आम्हाला खासदारनिधी देऊन टाका. आपण यात कपात करू शकत नाही. आम्ही या निधीच्या माध्यमातूनच आमच्या मतदारसंघात कामे करतो. पंतप्रधान मोदींकडे 303 खासदार आहेत. याचा अर्थ इतर खासदारांचे काहीच महत्व नाही, असा होतो का? असा प्रश्नही रॉय यांनी यावेळी विचारला.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of