देश

ग्राहकांसाठी गुड न्यूज; कार झाली स्वस्त

Cars Hyundai offer

तुम्हाला जर कार घेण्याची इच्छा असेल पण महाग असल्यामुळे तुम्ही ती घेणे टाळत असाल तर एक आनंदाची बातमी आहे. कारण कार स्वस्त झाली आहे.

वाहन उद्योग क्षेत्रावर मंदीचे सावट असून त्यातच बीएस 6 च्या घोषणेनंतर कंपन्यांनी जुन्या कार विकण्यास सुरुवात केली आहे. या कारवर मोठ्या प्रमाणावर सूट दिली जात आहे. मारुती कंपनीनं दिलेल्या ऑफरनंतर आता ह्यूंडाईनेसुद्धा ग्राहकांना दोन लाख रुपयांपर्यंत सूट दिली आहे.

Xcent या कारवर 95 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या कारची किंमत 5 लाख 81 हजार रुपयांपासून आहे. पेट्रोल आणि डीझेल दोन्ही कारवर सूट देण्यात येत आहे.

सॅन्ट्रो ह्यूंडाईच्या सर्वात स्वस्त कारपैकी एक असलेल्या या कारवर 40 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. या कारची किंमत 3.90 लाख रुपयांपासून आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of