देश

धक्कादायकः भारतात समूह संसर्गाला सुरुवात

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे देशात समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) म्हटले आहे. त्यामुळे देशात चिंता वाढली आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोना संसर्गाची स्थिती अधिक गंभीर होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. समुह संसर्गाच्या स्थितीत संसर्ग झालेल्या व्यक्तीला कुणाकडून आणि कोठे संसर्ग झाला याचा तपास करणे अशक्य होते आणि त्यामुळे संसर्गाचा वेगही वाढतो.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर व्ही. के मोंगा यांनी याबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. डॉ. मोंगा म्हणाले की, प्रत्येक दिवशी देशात 30 हजारहून जास्त रुग्ण समोर येत आहेत. ही फार गंभीर स्थिती आहे. आता हा संसर्ग देशातील ग्रामीण भागात देखील सुरु झाला, याचा अर्थ असा आहे की, देशात कम्युनिटी ट्रांसमिशन सुरु झालं आहे, असं डॉ. मोंगा यांनी म्हटलंय.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of