देश

‘दिवसाला सहा तास काम अन् चार दिवसांचा आठवडा भारतातही लागू करा’

भारतातही दिवसाला सहा तास काम अन् चार दिवसांचा आठवडा लागू करा अशी मागणी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भारतीय नागरिकांनी केली आहे.

जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळवणाऱ्या फिनलँडच्या नवनिर्वाचित पंतप्रधान सना मरीन यांनी देशातील कामगार वर्गासाठी एक महत्वपूर्ण प्रस्ताव मांडला आहे. फिनलँडमधील कार्यालयीन कालावधी कमी करुन तो दिवसला सहा तास करावा, त्याचप्रमाणे पाच दिवसांऐवजी चार दिवसांचा आठवडा करावा असा प्रस्ताव मरीन यांनी मांडला आहे. विशेष म्हणजे प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणीही लवकरच सुरु होणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर भारतीय नागरिकांनी सना यांनी घेतलेल्या या निर्णयाची सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा केली असून काहींनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करुन फिनलँडच्या पंतप्रधानांच्या या निर्णयाचा एकदा अभ्यास करा असा सल्लाही दिला आहे.

आता यावर पंतप्रधान मोदी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of