देश

मोदींच्या सभेला पुणेकरांची पाठ; रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची काल (गुरुवारी) पुण्यातील एस.पी कॉलेजच्या मैदानावर प्रचारसभा होती. मात्र या सभेला चक्क पुणेकरांनी पाठ फिरविली असल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर मोदींच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ  व्हायरल होत आहे.

भाजप-शिवसेना युतीच्या प्रचारासाठी मोदी यांची सभा पुण्यात झाली. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष माधुरी मिसाळ आदी उमेदवार उपस्थित होते. राष्ट्रवादीचे समर्थन करणाऱ्या काही फेसबुक पेजेसवरुन मोदींच्या सभेतील मागील रांगेतील शेकडो खुर्च्या रिकाम्या असल्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आलेले आहेत.

काल पुण्यात मोदींच्या सभेत तूफान गर्दी होती…चेंगराचेंगरी होता होता राहिली…नाहीतर हजारों पुणेकर चिरडले गेले असते…बघाच विडिओ…

Posted by Chhaya Thorat on Thursday, 17 October 2019

 

या सभेमध्ये मोदींनी अनुच्छेद ३७० रद्द करणे, जनतेच्या पैशांची लूट करणाऱ्यांना शिक्षा करणे, सुरक्षा, स्वच्छता, रेल्वे, विमानमार्ग अशा अनेक विषयांवर भाष्य केले. मात्र या सभेसाठी मोठी गर्दी होईल अशी अपेक्षा भाजपाला होती जी सपशेल फेल ठरल्याचे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून दिसून येत आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of