देश

गुजरातमध्ये साठ फूट लांब असलेला पुल कोसळला

गुजरातच्या जुनागड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे एक 40 वर्ष जूना असलेला साठ फूट लांबीचा पुल कोसळल्याची घटना घडली आहे. मात्र या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

पूल कोसळला त्यावेळी पुलावर काही गाड्यांची ये-जा सुरू होती. त्यातच अचानक पुल कोसळला. त्यामुळे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी गाड्यांमध्ये असणाऱ्या नागरिकांना बाहेर काढले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुसळधार पावसामुळे पुलाखालून जमीन घसरली होती, त्यामुळे पूल कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. पूल कोसळल्यामुळे 500 मीटरपर्यंतच्या रस्त्यावर दरड कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर रस्ता बंद झाला असून वाहनांना दुसऱ्या मार्गावरुन जावे लागले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of