देश

कोरोनाने मोडला आतापर्यंतचा रेकॉर्ड; 24 तासांत 45,720 नवे रुग्ण

कोरोनाने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या 24 तासांत 45 हजार 720 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 24 तासांत 1 हजार 129 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 लाख 38 हजार 635 इतकी झाली आहे. आतापर्यंत सात लाख 82 हजार 606 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर चार लाख 26 हजार 167 रुग्णांवर उपचार सुरु आहेत

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of