देश

‘या’ तारखेपासून राज्यात सलून सुरु होणार !

महाराष्ट्रात येत्या 28 जूनपासून सलून आणि जिम सुरु होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनदरम्यान सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र अनलॉकिंगनंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहे.सलून आणि जिम या आठवड्यात सुरु होईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

28 जूनपासून सलून सुरू होणार असले तरी सध्या फक्त केस कापण्याचीच परवानगी असेल, दाढी करण्याची परवानगी सध्या नाही. केस कापणाऱ्याने आणि कापून घेणाऱ्या दोघांनाही मास्क घालणं बंधनकारक असेल.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of