देश

कोरोनावर औषध शोधणाऱ्या पंतजलीच्या जाहिरातींवर आयुष मंत्रालयाची बंदी

योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने कोरोना सात दिवसांत पूर्णपणे बरा करणारे पहिले आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला. त्यानंतर आयुष मंत्रालयानं उत्तराखंड, हरिद्वारस्थित पतंजली आयुर्वेदीक लिमिटेडच्या नावे एक पत्रक जारी केलं. या पत्रात औषधाचा तपशील आणि त्याच्या वैद्यकिय चाचणीचे, निकालाचे अहवाल सादर करण्याची विचारणा करण्यात आली आहे.

आयुष मंत्रालयाने या औषधांच्या जाहिरातीवर बंदी घातली आहे  यासाठी आयुष मंत्रालयाने चौकशी समिती नेमली आहे. आयुष मंत्रालयाने पतंजलीने तयार केलेल्या औषधाची तपासणी होईपर्यंत जाहिरात थांबविली आहे.

बाबा रामदेव यांनी जाहीर केलेल्या कोरोना औषधाचं नाव ‘कोरोनिल’ असं आहे. आयुष मंत्रालयाने बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीकडे या औषधाबाबत सविस्तर माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. या औषधाचं कशाप्रकारे संशोधन करण्यात आलं, याबाबत सविस्तर माहिती मागितली आहे. त्याचबरोबर उत्तराखंड सरकारकडेही या औषधाच्या परवानाबाबतची माहिती मागितली आहे.

 

 

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of