देश

विद्यार्थ्यांनी शांततेत आंदोलन केल्याने हायकोर्टाने केले कौतुक

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराविरोधात विद्यार्थ्यांनी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाच्या मैदानावर आंदोलन केले. या आंदोलनाची दखल हायकोर्टाने घेतली आहे. शांततेत आंदोलन करून आपल्या आवाजाची ताकद अधिकाधिक कशी वाढवायची हे विद्यार्थ्यांकडून सगळ्यांनी शिकले पाहिजे असे म्हणत हायकोर्टाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी अर्थात जेएनयूमध्ये ५ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मुंबईतल्या गेट-ऑफ इंडियाजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांना ३६ तासांची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानात आंदोलन करण्याचं आवाहन केलं. गेट वे ऑफ इंडियाजवळील आंदोलनामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होतोय. तसंच पर्यटकांनाही अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे आंदोलकांना आझाद मैदानात जाण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. मात्र त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.

शांततेत आंदोलनं कशी करायची हे आजची तरुणाई प्रत्येकाला शिकवत आहे त्यामुळे त्यांच्या आवाजाची ताकद वाढली आहे असं हायकोर्टानं म्हटलंय. शिवाजी पार्कसंदर्भात विकॉम ट्रस्टनं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती आर. आय. छागला यांच्या खंडपिठानं या आंदोलनाचे कौतुक केलं आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of