isros
देश

नासाकडूनही इस्त्रोच्या दैदिप्यमान कामगिरीचे कौतुक !

“चांद्रयान मोहिमेचा तुमचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे”, अशा शब्दांमध्ये जगातील सर्वोच्च अंतराळ संशोधन संस्था नासानेही इस्रोच्या दैदिप्यमान कामगिरीचे आणि भारतीय शास्त्रज्ञांचं कौतुक केले आहे.

सौर प्रणाली नेमकी कशी काम करते याविषयीच्या संशोधनासाठी येत्या काळात इस्रोसोबत काम करण्याची इच्छाही नासाकडून व्यक्त करण्यात आली.  ‘अंतराळ काही सोपं नाही. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडर उतरवण्याच्या चांद्रयान २ मोहिमेच्या प्रयत्नांसाठी आम्ही इस्रोचं कौतुक करतो. तुमच्या आतापर्यंतच्या या प्रवासातून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. येत्या काळात संधी मिळाल्यास सौर प्रणाली कशी काम करते यावर एकत्रितरित्या काम करु अशी आशा आहे…..’, असं ट्विट नासाकडून करण्यात आले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of