देश

एकजूट होऊन जवानांसोबत उभे राहा; पंतप्रधान मोदींचे आवाहन

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विशिष्ट वातावरणात संसदेचे अधिवेशन सुरु होत असल्याचे म्हटले आहे. आपले वीर जवान सीमेवर मातृभमीच्या रक्षणासाठी मोठ्या हिंमतीने सुरक्षा देत आहेत. त्याच विश्वासाने संसदेतील सर्व सदस्य एका स्वरात, एका भावनेने देशाच्या जवानांच्या मागे देश उभे असल्याचा संदेश देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘हिंमत, उत्साह आणि आत्मविश्वासासह आपल्या सेनेचे वीर जवान सीमेवर उभे आहेत. दुर्गम भागांत ते देशाच्या संरक्षणासाठी उभे आहेत. काही वेळातच बर्फाचा वर्षावही सुरू होईल. ज्या विश्वासासोबत ते उभे आहेत, सदनाचे सर्व सदस्य एक स्वर, एक भाव, एक भावना आणि एका संकल्पाने हा संदेश देतील, की देश सेनेच्या जवानांच्या मागे भक्कमपणे उभा आहे. संसद आणि संसदेतील सदस्यांच्या माध्यमातून देश उभा आहे. हाच मजबूत संदेश हे सदनदेखील देईल. सर्व माननीय सदस्यांच्या माध्यमातून देईल’ असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of