देश

‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे प्रकाशन; शिवप्रेमींनी व्यक्त केला संताप

‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे भाजपाच्या दिल्ली कार्यालयात प्रकाशन झाले आहे. भाजप नेते जय भगवान गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. आत्तार्यंत अनेक शिवप्रेमींनी पुस्तकाच्या शीर्षकावर संताप व्यक्त केला आहे.

भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी भाजपाचे दिल्लीचे अध्यक्ष मनोज तिवारींसह भाजपाच्या नेत्यांची उपस्थिती होती. जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांनीच या पुस्तक प्रकाशनाची माहिती ट्विट करून दिली होती.

काही दिवसांपूर्वीच छत्रपतींच्या घराण्याचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना फटकारले होते. त्यामुळे आता या मुद्द्यावर छत्रपती संभाजीराजे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of