देश

रघुवंश प्रसाद सिंह यांचे कोरोनामुळे निधन

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते  उपचारा दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे ते निकटवर्तीय होते. बिहारच्या राजकारणात रघुवंश बाबू अशी त्यांची ओळख होती. रघुवंश प्रसाद सिंह यांनी गुरुवारी राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र, ‘आधी लवकर बरे व्हा, बसून चर्चा करू’, असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं होतं. त्यांच्या निधनानंतर लालू प्रसाद यादव यांनी शोक व्यक्त केला.

लालू प्रसाद यादव यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. “प्रिय रघुवंश बाबू, हे आपण काय केलं? मी परवाच आपल्याला सांगितलं होतं की, तुम्ही कुठेही जात नाही आहात. पण, तुम्ही इतके दूर निघून गेलात. निशब्द झालोय. दुःखी झालोय. तुमची खूप आठवण येईल,” असं म्हणत लालू प्रसाद यादव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of