देश

एसबीआयच्या ग्राहकांना बसणार हादरा; 1 नोव्हेंबर पासून होईल ‘हा’ बदल

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना एक मोठा धक्का बसणार आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने बचत खात्यावरिल व्याज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवा नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.

बँक 1 लाख रुपयांच्या ठेवींवर पाव टक्क्यांनी कपात करणार आहे. परिणामी, नव्या नियमानुसार बचत खातेदारांना 1 लाख रुपयांच्या ठेवीवर मिळणारं व्याज साडेतीन टक्क्यांवरुन सव्वातीन टक्क्यांनी मिळेल. म्हणजेच व्याज दरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

या महिन्यात आरबीआयने पॉलिसी रेट्समध्ये पाचव्यांदा कपात केली आहे. यानंतर एसबीआयने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला. 10 ऑक्टोबरला फीक्स डिपॉझिटच्या व्याजदरात कपात करण्यात आली होती.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of