देश

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेत दाखल

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी देखील अमेरिकेत गेले आहेत. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी त्या अमेरिकेला गेल्या आहेत.

राहुल गांधी आठवडाभरात पुन्हा भारतात परततील असं सांगण्यात येत आहे. दरम्यान सोनिया गांधी यांची वैद्यकीय चाचणी यापूर्वीच करण्यात येणार होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यांची वैद्यकीय तपासणी आता करण्यात येणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे.

वैद्यकीय चाचणीसाठी अमेरिकेत गेल्यामुळे सोनिया गांधी संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहू शकणार नाहीत. सोनिया गांधी दोन आठवड्यांनी भारतात परततील असंही काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितल्याचं एएनआयने म्हटलं आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of